
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :-राष्ट्रीय महामार्गावरील लोहा बसस्थानक परिसरात वृक्षमित्र परिवाराच्या वतीने नुकतेच विविध वृक्षांची रोपटे लागवड करण्यात येवून त्यांना संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. सदरील रोपट्यांना वर्षाच्या अखेरच्या सोमवारी सेंद्रिय खताची पहिली मात्रा देण्यात आली.लोहा मध्यवर्ती बसस्थानकात एस टी बसेस मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याने बसस्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ कमी आहे. त्यानुषंगाने स्वच्छतादुत राजीव तिडके यांच्या पुढाकारातून प्रारंभी बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेत स्वच्छता मोहीम राबवून अवारभिंत लगत खड्डे खोदून पर्यावरण पूरक पिंपळ, वड व सप्तपर्णी आदी जातींचे रोपटे लागवड करण्यात आले व त्यांना संरक्षक जाळी बसविण्यात आली. वर्षाच्या अखेरच्या सोमवारी दि. 27 रोजी स्वच्छतादुत राजीव तिडके यांच्यासह माजी नगरसेवक उत्तम महाबळे, पत्रकार शिवाजी पांचाळ, प्रदीपकुमार कांबळे, श्याम पाटील नळगे, पञकार गोविंद पवार बाळासाहेब बुध्दे व बसस्थानकाचे सुरक्षा रक्षक लतिफ शेख आदींच्या उपस्थितीत जलदुत दीपक मोरताळे यांनी उपलब्ध करून दिलेले सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले बायोंझाम द्रवरूप खत प्रत्येक रोपट्यास देण्यात आले.