
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता.प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
नायगाव,दि.२७ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम सह फुलवाल्याला २५ हजार लाच स्वीकारताना ०३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक ला.प्र.वि नांदेड यांचे द्वारे या प्रकरणी सक्षम अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी, नांदेड यांना कारवाई नंतर एक दोन दिवसात पत्र पाठवून या घटनेची माहिती देण्यात आली असली तरी एसीबीच्या जाळ्यात अडकलेला अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्याप निलंबित केले नसल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या वेबसाइटवर सांख्यिकी सदरात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केल्यावरुन स्पष्ट झाली आहे.