
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
कोकणे उमाकांत
देगलूर :- देगलूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे प्रति क्विंटल दर घसरले असून सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. परिणामी व्यापारी ,हमाल, मापाडी सध्याला अडचणीत आले आहेत शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आपला माल घरीच ठेवल्याने कुंड्यांमध्ये हमाल मापाडी च्या हाताला काम नसल्याने तेही अडचणीत आले आहेत.देगलूर येथील बाजारपेठ प्रसिद्ध असून तालुक्यातील 60 गावांच्या नागरिकांचा शेतकऱ्यांचा शेतमाल या बाजार समितीत विक्रीला येतो .मात्र यावर्षी भावाचे मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आपला मालक घरी ठेवला आहे. परिणामी व्यापार्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे सध्याला मुनी माणसा पगार करणेही कठीण झाले आहे. त्याचबरोबर हमाल ,मापाडी यांनाही काम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत आहेत.
दरवर्षी सुगीच्या दिवसात हजार ते दोन हजार क्विंटलची आवक देगलूरच्या बाजार समितीत दररोज होते सध्या आवक घटल्याने बाजार समितीत सर्वत्र शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे शिवाय सोयाबीनचा भाव सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे रुपयांच्या घरात आला आहे सोयाबीन सोडले तर कुठली आवक फारशी होत नाही.हमाल मापाडी ना शासनाने दरमहा दहा हजाराचे अनुदान द्यावे व्यापाऱ्यांना टॅक्स कमी करावा अशी मागणी व्यापारी संघटना कडून होत आहे.