
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
शिऊर :- वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत भक्तींचे विचार समाजातील सर्व लोकांच्या मनात रुजवत भागवत श्रवण करून मार्गशीर्ष वद्य अष्टमी शके १६६७ साली समाधी घेणारे श्री संत शंकरस्वामी महाराज यांचे पवित्र प्रणीता तीर्थाच्याच्याकडेला टोलेजंग समाधीस्थळ सध्या अध्यात्म क्षेत्राचे केंद्रबिंदु ठरत आहे.संतभूमी शिऊर येथे बांधण्यात आलेले फुटी मंदीर मराठवाड्यातील सर्वात मोठे मंदिर ठरले असुन अध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.औरंगाबाद -नाशिक 752 राष्ट्रीय महामार्गावार वसलेल्या वैजापूर तालुक्यातील शिऊर हे वीस हजार लोकसंख्येचे गाव. ऐतिहासिक , सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपणारे गाव अशी या गावाची ओळख आहे. त्यासोबतच मंदीरांचे गाव म्हणुन देखील शिऊर परिचित आहे. श्री संत बहीणाबाई पाठक, श्री संत शिवाई माता यांचे समाधी स्थळांबरोबरच जगतगुरु तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय आणि निळोबारायांचे शिष्य श्री संत शंकरस्वामी महाराजांची समाधी देखील शिऊर गावी असल्याने भक्तीचा त्रिवेणी संगम येथे पहायला मिळतो. सध्या श्री संत शंकरस्वामीं महाराजांचा २७७ वा पुण्यतिथी महोत्सव पार पडत आहे.
*देखणे मंदिर*
श्री संत शंकरस्वामीं शके 1667 साली समाधीस्थ झाले त्यानंतर 1849 च्या दरम्यान, त्याकाळात प्रचंड नाणे टंचाई असताना भाविकांनी हातभार लावला होता. त्यावेळी मंदिराचे वाळु व चुणा एकत्र करत त्याला दगडी चाकाने रगडवून त्या मिश्रणातून दगडाचे बांधकाम केले होते. त्यानंतर वेळोवेळी त्यात पुर्नजिर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात येवून पुर्ण करण्यात आले. 2013 साली देखील नव्याने मंदीर बांधकामाचा िनर्णय घेण्यात येवून तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या योगदानातून व भावीकांच्या देणग्यांच्या माध्यमातून कुठलीही शासकीय मदत न वापरता मंिदर िजर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले. मंदीरामध्ये विश्वस्त मंडळाचे कार्यालय,कीर्तनकार व प्रवचनकारांची राहण्याची सोय, अध्यात्म संस्कार केंद्र आदी व्यवस्था केली गेली आहे. या सोबत मंदिर परिसरावर शुशोभीकरण करण्यात येत असून भव्य कीर्तन मंडप लक्षवेधी ठरला आहे तर मंदिराच्या माध्यमातून व्यापारी संकुल देखील उभारले गेले आहे. प्राणिता तीर्थ घाटबांधकाम आता हाती घेण्यात येणार आहे