
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : 2021 मध्ये क्रिकेट जगतात अनेक अनोख्या घटना घडल्या. न्यूझीलंड पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन होताना चाहत्यांनी पाहिले.किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव केला. 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाने 14 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि प्रथमच T20 चॅम्पियन बनला. अशा गोड क्षणांसह क्रिकेटच्या मैदानात अनेक अनेपेक्षित घटना घडल्या ज्यामुळे अनेक संघमध्ये खळबळ माजली.
सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीला 2021 च्या अखेरीस वादांना सामोरे जावे लागले. विराट कोहलीने आधी टी-20 कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर अचानक त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीच्या हकालपट्टीने चाहत्यांना आणि जागतिक क्रिकेटला आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहलीने वनडे कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर आणखी एक वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत दावा केला आहे की, त्यांनी विराट कोहलीला टी-२० कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. त्याने टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतरच वनडे कर्णधार बदलण्याची गरज होती. तर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी गांगुलीचा दावा फेटाळून लावला. कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखले नाही, मात्र कर्णधारपद सोडण्याच्या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आल्याचे विराट कोहलीने सांगितले. बीसीसीआयने ज्या प्रकारे विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले, त्यानंतर जगातील बहुतांश क्रिकेट बोर्डांवर जोरदार टीका झाली.