
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वाढदिवसाचा ‘जश्न’ नुकताच पार पडला. सलमानचा खास मित्रपरिवार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वाढदिवसाची रंगत पाहायला मिळाली.सूत्रांच्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची सून आणि त्यांचा मुलगा, म्हणजेच रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचीही भाईजानच्या वाढदिवसाला हजेरी होती.सलमानला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच जेनेलिया नं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला.
व्हिडीओमध्ये ती केनीं लोगिन च्या फुट लुज गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. सलमानही तिला यामध्ये साथ देताना दिसत आहे.मुख्य म्हणजे सलमान जिनिलीयाचा डान्स पाहून फक्त भारावतच नाहीये, तर तिच्या डान्सिंग स्टाईलप्रमाणेच नाचण्याचा प्रयत्नही करत आहे.अतिशय मनापासून नाचणाऱ्या जिनीनं तितक्याच मनापासून सलमानला शुभेच्छाही दिल्या.पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय, चर्चा झाली ती या सैराट डान्सची.यंदाच्या वर्षी सलमानचा वाढदिवस काहीसा संमिश्र भावभावनांचा होता. कारण, या खास दिवसाच्या आधीच त्याला फार्महाऊसवर एका सापानं दंश मारला होता.सलमानला साप तिनदा चावल्यामुळं चाहत्यांसह त्याच्या कुटुंबीयांचीही चिंता वाढली होती. पण, संकट थोडक्यातच टळलं आणि भाईजान सुखरुप घरी परतला.