
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज:- पेठवडज ते कंधार हा रस्ता प्रस्तावीत ८० फुटाचा आहे. हा रस्ता १०० फुटाचा होणे अपेक्षित आहे. कारण हा रस्ता गावासाठी मुख्य रस्ता असुन या रस्त्यावर जि. प. शाळा आहे. दवाखाना, पशुवैदकीय दवाखाना, इंग्लीश स्कुल, मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, लाईट ऑफीस, संत नामदेव विद्यालय, पोलीस दुरक्षेत्र, शेतक-यांचे माल वाहतुकीचे सोसायटी गोदाम आहे. आडती, मोठे व्यापारी आहेत. मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. त्यामुळे हा रस्ता १०० ते १२० फुटाचा होण्याची अपेक्षा आहे. पेठवडज हे गाव निजामकालीन काळात बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते २० ते २५ गावाचा संपर्क येतो सर्कलचे गाव असून या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. गावाच्या पुर्वेस नऊ कि.मी. वरुन महामार्ग गेलेला व पश्चिमेस १० कि.मी. वरुन महामार्ग गेलेला आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गावाच्या हिताचे आहे.यापूर्वी या विषयी सहा ते सात वेळा या विभागासह अन्य विभागांनाही पत्र व्यवहार केला आहे तरी मा.ना.अशोकरावजी चव्हाण साहेब(सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री, नांदेड),मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड,मा.तहसिलदार साहेब कंधार,मा.उपअभियंता साहेब (सार्वजनिक बांधकाम विभाग,कंधार) यांनी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय दयावा असे विनंती पत्र जाधव व्यंकटी गोविंद(तालुका उपाध्यक्ष कंधार),पांडुरंग व्यंकटी कंधारे(भ्र.वि.ज.आं अण्णा हजारे पेठवडज), विठ्ठल गायकवाड(सामाजिक कार्यकर्ते), माधव रामराव वडजे(माजी जिल्हा सहसचिव) यांनी केले आहे.