
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
भारतातील कुमारवयीय मुलांमधील (12 ते 19 वर्षे) लठ्ठपणाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाच्या प्रादुर्भावाचे आणि त्याच्या जोखीम घटकांचे अनुमान काढण्यासाठी अलीकडे घेण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की बॉडी मास इंडेक्सनुसार 12.10% मुले अतिवजनदार होती आणि 8.7% मुले लठ्ठ होती. दक्षिण कर्नाटकामधील कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या आणखी एका अभ्यासातून असे आढळले की कुमारवयांमधील अतिवजनाचा एकूण प्रादुर्भाव 9.9% असून लठ्ठपणाचा प्रादुर्भाव 4.8% एवढा आहे.
आताच्या काळात कुमारवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या दिसून येतात. अशा मुलांना श्वसनक्रमात बिघाड होण्याचा, व्यत्ययकारी निद्रा अश्वसनाचा धोका जास्त असतो. झोप कमी झाल्याने किंवा झोप अस्वस्थपणे झाल्याने लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणाचा कुमारवयांतील मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हे या लेखात दिले आहे.
लठ्ठ कुमारवयीन मुलांना इतर संबंधित विकार होण्याचा धोका बळावतो. वजन वाढते तशी ग्लुकोज सुसह्यता बिघडण्याची जोखीम वाढते. टाईप 2 डायबिटीस जलद बळावणार्या (प्रोग्रेसिव्ह) न्युरोपाथीशी (एक किंवा अधिक चेतांना अपाय किंवा त्यांच्या कार्यात बिघाड), रेटिनोपाथीशी, नेफ्रोपाथीशी, आणि हृदयविकारांशी निगडित असल्याने, तो टाळणे, त्याचे लवकर निदान होणे आणि त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते.
टाईप 2 डायबिटीस नसला तरीही लठ्ठ कुमारवयीनांना प्रौढत्वात हृदयविकार होण्याची जोखीम जास्त असते कारण त्यांना उच्च रक्तदाब होण्याची आणि रक्तातील एक किंवा अनेक प्रकारच्या लिपिडच्या (मेद) पातळ्या रोगट प्रमाणात वाढण्याची जोखीम वाढलेली असते.टाईप 2 डायबिटीस नसला तरीही लठ्ठ कुमारवयीनांना प्रौढत्वात हृदयविकार होण्याची जोखीम जास्त असते कारण त्यांना उच्च रक्तदाब होण्याची आणि रक्तातील एक किंवा अनेक प्रकारच्या लिपिडच्या (मेद) पातळ्या रोगट प्रमाणात वाढण्याची जोखीम वाढलेली असते.लठ्ठपणामुळे कुमारवय यांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीझ होऊ शकतो.लठ्ठ कुमारवयीन मुलांना फ्रॅक्चर होण्याचा धोकाही जास्त असतो कारण शरीराच्या मापाशी तुलना करता त्यांचे अस्थि वस्तुमान कमी झालेले असते.
लठ्ठ कुमारवयीन स्त्रीला वैद्यकीय, मानसशास्त्रीय आणि प्रजननात्मक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने, लघुकालीन आणि दीर्घकालीन संबंधित विकार टाळणे अत्यावश्यक असते.
कुमारवयांसाठी उपलब्ध असणारे विविध वजन व्यवस्थापनाचे पर्याय कोणकोणते आहेत?स्ट्रॉंग आजपर्यंत, जीवनशैलीतील बदलांमुळे वजन घटीवर केवळ अल्प प्रमाणातच परिणाम झालेले दिसून आले आहे. आहारात्मक, औषधशास्त्रीय किंवा एकत्रित वर्तणूक कार्यक्रमांमधून निर्वाही वजन घट क्वचितच साध्य होते. सर्व पारपंरिक उपचार करूनही उपाय होत नसेल तर बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा विचार करता येऊ शकतो. टीप : वरील सर्व माहिती संग्रहित आहे ; याचा उपयोग करण्याच्या अगोदर संबंधित डॉक्टरांशी संवाद करणे