
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी औरंगाबाद
मोहन आखाडे
नांदूरशिगोटे:- नांदूरशिगोटे गावातील रेणुका माता, कुलदैवत खंडेराव महाराज , समाज्याचे दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब , भगवानबाबा यांचे दर्शन घेऊन,अवजीनाथ बाबा,वामनभाऊ यांचे स्मरण करून ग्रामपंचायत कार्यालयात बालसंस्कार शिबिरास सुरवात झाली. वंजारी महासंघाचे संस्थापकअध्यक्ष आणि वंजारी स्वयंम सेवक संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय गणेश खाडे साहेब यांनी बालसंस्कार शिबिरास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम मार्गदर्शन केले. त्या नंतर वंजारी स्वयंम सेवक संघाचे राज्यकार्यकरणी सदस्य आदरणीय विलास सानप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला नांदूरशिगोटे गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि मानोरी गावचे सरपंच उपस्थित होते
आभार प्रदर्शन नांदूरशिगोटे गावचे सरपंच श्री गोपाळ शेळके यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात वंजारी स्वयंम संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव सानप यांनी ग्रामस्थांची मिटिंग घेऊन वंजारी समाज एकीकर्णाचे फायदे, हल्ली पाळणा घर पद्धतीमुळे लयास चालले संस्कार , आशा परिस्तितीत बालसंस्काराची गरज ,तसेच समाज्याचा सामाजिक,राजकीय,आर्थिक विकास उन्नती होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने योगदान दिले पाहिजे, समाज हे कुटुंब आहे हिमुल भावना रुजली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
मानवी जीवनात संस्कार हि अशी स़ंपती आहे कि जीच चोरी होत नाही कधीच संपुष्टात येत आहे आणि सगळ्यात मौल्यवान संपत्ती हि संस्कार आहे आणि संस्कार युक्त समाज हा प्रगतिशील समाजाचा लक्षण आहे बाल्य अवस्था हि नाजुक अवस्था आहे. यामध्ये ज्या पद्धतीने संस्कार होतील त्या पद्धतीने पिढी घडेल आज काल ची पिढी खुप झपाट्याने बदलत आहे पण हा बदल होत असताना आपले संस्कार हे सदैव आचारणात असले पाहिजे. आपले संस्कार आणि विघमान जग याचा ताळमेळ घालता आला पाहिजे.
आदर्श व्यक्तिमत्व दुरुदृषटी महापुरुष जर घडायचं असेल तर रामायण महाभारत तसेच आध्यत्मिक ज्ञान आणि संत भगवान बाबा संत वामन भाऊ संत अवजीनाथ महाराज तसेच लोकनेते स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब व v n नाईक शिक्षण संस्थेचे संस्थापक वसंतराव नाईक मनमाड कर यांचं योगदान समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आणि नव्यानेच घडत असलेल्या पिढी पर्यन्त पोहचलं पाहिजे शुन्यातून विश्व निर्माण होऊ शकते. पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे शिक्षण हे समाज विकासाच सगळ्यात मोठं साधन आहे. त्या अनुषंगाने समाजातील महापुरुष यांनी घेतलेली प्रचंड मेहनतीने आपण आज इथपर्यंत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या जीवनातील संघर्ष अनुभवाला पाहिजे संघर्ष शिवाय काही ही नवीन निर्माण होत नाही. राष्ट्र निर्माण होण्या मध्ये योगदान देयच असले तर सर्व धर्म समभाव मानुन स्व धर्म संस्कार युक्त घडविणे हे मुलभूत धेय्य डोळ्यासमोर ठेवून आणि मुलं हि अगोदर कुटुंब गाव जिल्हा राज्य देशाची संपत्ती आहेत. तसेच समाजाची पण् संपत्ती आहेत. समाजाची प्रगती विकास प्रत्येक येणाऱ्या पिढीवर अवलंबून असतो म्हणून समाजाचा सामाजिक राजकीय आर्थिक विकास दर वाढविण्यासाठी संस्कार युक्त पिढी घडविणे आवश्यक आहे आणि कार्यक्रमाची पसायदानाने सांगता झाली.