
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
प्रा. अंगद कांबळे
मुंबई :- मुंबई विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन आर्चरी निवड चाचणीत महात्मा एक्युकेशन सोसायटीच्या विद्याधिराजा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड रिसर्च, खांदा कॉलनी पनवेल या शारीरिक शिक्षणशास्र महाविद्यालयात बी.पी.एड द्वितीय वर्षात शिकत असलेल्या काजल गोरिया व सुलोचना चव्हाण यांची मुंबई विद्यापिठाच्या महिला आर्चरी संघात निवड करण्यात आली. १८ ते २२ जानेवारी २०२२ या कालावधीत चंदीगड विद्यापीठ मोहाली येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा संघ सहभागी होईल. या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप शिंदे व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.