
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधि
मारोतीकदम
लोहा :-लोहा येथील सुप्रसिद्ध मोरया आर्थोपेडिक हॉस्पिटल शिवकल्यान नगर येथे डॉक्टर दीपक भारती सर डॉक्टर विनया भारती मॅडम यांच्या आग्रहास्तव खासदार साहेबांनी मोरया हॉस्पिटल ला भेट दिली, त्यावेळी लोहा नगरपालिका उपनगराध्यक्ष तथा भाजपा लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, गंगाधर सावकार सूर्यवंशी ,नागेश भाऊ कदम,सोबत होते. खासदार साहेबांनी दवाखान्यामध्ये आल्यानंतर दवाखान्यातील सुविधा पाहून आनंद व्यक्त केला, डॉक्टर भारती सरांनी मोरया हॉस्पिटलमध्ये खासदार साहेबांचा यथोचित असा सन्मान केला खासदार साहेब यांनी यावेळी लोहा शहर हे दवाखान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे आणि आता रुग्णांना नांदेडला जाण्याची काही गरज नाही ही एक चांगली बाब आहे असे दवाखान्यातील सोईसुविधा पाहून समाधान व्यक्त केले खरच डाॅ.भारती सरांची, डाॅ.भारती मॅडमची मेहनत ,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून ते 24 तास जनतेची सेवा करतात आणि या दवाखान्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अतिशय कमी दरात चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत त्यामुळे जनतेतून एक प्रकारची या दवाखान्या विषयी चांगली भावना आपणास दिसून येते