
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यात कोरोनाची नियमावली जाहीर झाली असतांना दुसरीकडे प्राप्त माहितीनुसार संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड-१९ चा राज्यात झालेल्या संक्रमानामुळे सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहे.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर,अंजनगाव सुर्जी,वरुड,चांदूरबाजार, चांदूररेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी,शें.घाट सोबतच अकोला,वाशीम,बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील येणाऱ्या नगरपरिषद यांची मुदत संपत आलेली असुन मुख्याधिकारी ,संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना प्रशासक पदाचा कार्यभार नियुक्त करण्यात येणार आहे.
कोविड-१९ चा संक्रमण पाहता शासनाने निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया लांबणीवर टाकली असल्याने सन२०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.०६.दि२३-०३-२०२१ अनुषंगाने मुदत समाप्ती नंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमद्धे प्रशासक नियुक्ती राज्य निवडणूक आयोग पत्र क्र. रानिआ/नपा-२०२१/प्र.क्र.९/का.६दि.२९-११-२०२१ अन्वये आदेश राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,अमरावती विभाग,अमरावती आणि जिल्हाधिकारी,अमरावती यांना कळविले आहे.