
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
मारोतीकदम
लोहा :- किवळा व ढाकणी यांच्या मध्यभागी महामार्गावर वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय तरुण मोटर सायकल वरून संध्याकाळी नऊच्या सुमारास घराकडे येत असताना नांदेड बीदर राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 50वर सी.सी. रस्ता तयार झालेला आहे व वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे या रस्त्यावर मात्र अपघाताची संख्या वाढली आहे ,सात ते आठ दिवसा खाली ढाकणी येतील एक नागरिक काळबा महाराज शिंदे अपघातात वारले असतानाच, दिनांक 26.डिसेंबर रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत वडगाव तांडा येथील प्रदीप शिवराम राठोड मोटरसायकल क्रमांक एम .एच .26. 5232 वरून घराकडे येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे प्रदीप राठोड हा जागीच ठार झाला