
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
टिप— एकुण रु.461 कोटी मंजुर त्यापैकी 336 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
कंधार :- नांदेड जिल्ह्यात आतिवृष्टीमुळे खरिपातील कापुस, सोयाबिन, मुग आणि उडिद या सर्वच पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते .यामुळे ईफ्को टोकियो जनरल इन्सुरन्स कंपनी कडुन विमाधारक शेतकऱ्यांना 461 कोटी विमा मंजुर झाला होता ,यातील पहिला हप्ता 73% नुसार 336 कोटी 53 लाख रु. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते .यानंतर शिल्लक 27 % आनुसार 124 कोटी 47 लाख अध्याप प्रलंबीत आहेत विमा कंपनीकडुन राज्य शासनाचा हप्ता मिळाला नसल्याने शेतकऱ्याचे पैसे थकल्याची माहिती सुञानी दिली.
विकविमा योजनेच्या शेतकऱ्यांना 6 पिकासाठी 461 कोटीचा विमा परतावा मंजुर झाला होता. या प्रस्तावाची 73%अनुसार 336कोटी 53 लाख विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.यानंतर शासनाकडुन येणाऱ्या विमाहप्ताची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल आसे विमा कंपनी कडुन सांगितलं यामूळे शेतकऱ्यांच्या 27% नुसार 124 कोटी 47 लाख रक्कम अद्याप प्रलंबीत आहे.जिल्ह्यातील एकूण 1622 गावापैकी 328 गावातील खरीपाच्या पिकांना पुराचा फाटका बसला तर इतर 1294 गावात ही सततच्या पावसाळ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते कंपनी कडुनबुडीत क्षेञातील328 गावातील सर्व सोयाबीन विमाधारकांना हेक्टरी 10 हजार 22 ते 22हजार 950रु.जोखीम रक्कम मंजुरी केली आहे इतर 1294 गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना किमान 7हजार 200 तेकमाल 16हजार 8 रुजोखीम मःजुर केली होती एकूण 461 कोटी 53 लांखाची रक्कम बॕंक खात्यावर जमाझाली आहेतर 27%अनुसार 124 कोटी 47लाखाची रक्कम मिळणे बाकी आहे राज्य शासनाने त्याच्या हिस्सा ची कंपनी कडे जमा केल्या नंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहीती कंपनीच्या सुञानी दिली आहे.