
दैनिक चालू वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – तालुक्यातील नेवरगाव, हैबतपुर सह गंगथडी भागात 2 वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारा व पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या गारा व पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या भागातील शेतकऱ्याचे वेचणीस आलेला कापूस, कांदा,गहू, भाजीपाला, टोमॅटो, लागवडीसाठी आलेले कांद्याचे रोपे इत्यादी पिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे .