दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:- राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री ना प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून ग्रामीण रुग्णालय भूम येथे आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य शिबीर,महा रक्तदान शिबिर आणि जागरूक बालक,सुदृढ पालक अभियानाचे उदघाटन मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते फीत कापून व प्रतिमा पूजन करून करण्यात आले व रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजयकुमार सुळ,मुख्याध्यापक टेळे सर यांच्या हस्ते गाढवे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ,शहर प्रमुख संजय पवार,युवा सेनेचे प्रभाकर शेंडगे, संजय चौधरी, माजी नगरसेवक सुनिल थोरात,देवळाली सरपंच समाधान सातव,माणकेश्वर सरपंच सतीश माळी,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील सर्व तज्ञ डॉक्टर्स,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शिनगारे,डॉ खराडे,डॉ कुटे यांच्यासह सर्व कर्मचारी, विकासरत्न संजय गाढवे मिञ परिवार, शहरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.