दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोशल मीडिया भु म तालुका प्रमुख पदी येथिल युवा कार्यकर्ते शांतीराज बोराडे तर सरचिटणीस पदी युवा कार्यकर्ते मुकुंद वाघमारे यांची जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. या वेळी जिल्हापरिषद माजी अध्यक्ष नेताजी आबा पाटील,जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर ,जिल्हा सरचिटणीस आदम शेख तालुकाध्यक्ष महादेव वडेकर,माजी नगरसेवक रोहन जाधव,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे ,तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.