दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.२९.बुलढाणा जिल्हा परिषद शेष फंडातून महिला-बालकल्याण म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती गर्भवती महिलांना निधी दिल्या जातो.अनुसूचित जाती-जमातीच्या जिल्ह्यात १५५९ महिला असून नांदुरा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प मध्ये अनुसूचित जाती जमातीचे १०० महिला आहेत. त्यांना खजुराचे २०० ग्राम चे पाकिट वाटायचे ठरले. प्रत्येकी १२ तर कुठे ११ प्रमाणे वाटप केले.यामध्ये नांदुरा तालुक्यातील १०० गर्भवती स्त्रियांसाठी प्रत्येकी ११ प्रमाणे ११०० पाकीट मिळाले आहे.मात्र खंडोबाचे पाकिटे प्रत्येक लग्नाला अकरा पाकीट देणे गरजेचे असताना नांदुरा येथील प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून तालुक्यामध्ये प्रत्येक महिलेला फक्त सात पाकिटे या ठिकाणी वितरित केले. म्हणजे त्यामधील चार पाकीट ते म्हणजे टोटल ४०० पाकिटे बाकी नेमके गेले कुठे ?.नांदुरा तालुक्यामध्ये एकूण शंभर लाभार्थी असून त्यासाठी पुरवठादारांकडून ते ११०० पाकिट या ठिकाणी देण्यात आली आहे. खजूर पाकिटे भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, संजय सिंह जाधव, ईश्वर पांडव, संदीप पाटील कोदरखेड निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला आहे.