दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : श्याम पुणेकर
श्रद्धा मेथे यांची सकाळ यिन केंद्रीय आरोग्य समितीवर निवड झाल्याबदल तिची सर्व सामाजिक, उदयो्यजिक, आणि मित्र, परिवार आणि इतर मंडळी कडून शुभेच्छाचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे श्रद्धाच्या आई वाडीलाने विशेष आनंद व्यक्त करून तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे येथे सकाळ यिन काँक्लेव्ह 2022 हा कार्यक्रम रविवारी सकाळी ( ता. 31 ) संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील विविध मानेवरांची उपस्थिती होती.
या वेळी श्रद्धा दिवाकरराव मेथे यांची केंद्रीय आरोग्य समितीवर एकमताने निवड झाली.
या निवाडीच्या वेळी कार्यक्रमाला सकाळ समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पवार पुण्याचें पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते.