दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कर्हाळे
कलंबर खुर्द :- लोहा तालुक्यातील कलंबर खुर्द येथे श्री. संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.हनुमान मंदिर कलंबर खुर्द येथील मंदिरात पोथी वाचन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. श्री. संत मोतीराम महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था करण्यात आली. परीसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी श्री. आऊलवार सर, प्रा. धारोबा गुंडे, प्रा. सुरेश पाटील घोरबांड, गोविंदराव पाटील, संभाजी देवकर, आनंदा पाटील, दिगंबर पाटील, शिवाजी तुंबरफळे, धनाजी पाटील, गावातील महीला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.