दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षात राज्य शासनाच्या आदेशानुसार १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या जव्हार आगाराच्या बसस्थानकात रा.प मंडळाचे अधिकारी,कर्मचारी आणि शेकडो प्रवाशांनी एक मिनिट स्तब्ध उभे राहून सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले.या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तसेच विविध राज्यात अनेक प्रकारचे उपक्रम,कार्यक्रम राबविले जात असून त्या अनुषंगाने सामूहिक राष्ट्रगीत गायन हा राज्य शासनाचा त्यातलाच एक उपक्रम असल्याने या उपक्रमात तालुक्यातील सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी शासकीय कार्यालये,शाळा,महाविद्यालये अश्या अनेक ठिकाणी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
या उपक्रमात जव्हार आगार सहभागी होत जव्हार बसस्थानकात देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जव्हार आगाराकडून बसस्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांसहित सामूहिक राष्ट्रगीत गायन करून राज्य शासनाच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात आपला उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.