दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे शहरातील नवीन इमारतीचे भूमीपूजन शुक्रवारी (ता.२) फडणवीस यांच्या हस्ते झाले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा निर्वाळा दिला. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे कायम आहे. पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केलेले आहे.