दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- आंध्रप्रदेशमधून पांढरकवडा-यवतमाळ-बाभूळगाव-चांदुररेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रक मधून गांजा तस्करी होत असल्याच्या गुप्तमाहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी स्वतः चांदुररेल्वे ते अमरावती रोडवरील मालखेड गार्डन फाट्याजवळील न्यू बादल हॉटेल समोर नाकाबंदी करून चार आरोपीं ज्यामध्ये ऋषभ मोहन पोहोकार वय २५ वर्ष रा.रिद्धपुर ता.मोर्शी जि.अमरावती,विक्की बस्तीलाल युवनाते वय २० वर्षे रा.शिरजगाव कसबा ता.चांदुर बाजार जि.अमरावती,शेख अरबाज शेख इलियास वय १९ वर्ष रा.आजाद नगर अमरावती,शेख तौसिफ शेख लतीफ वय १९ वर्ष रा.रतनगंज खुर्शीदपुरा अमरावती यांचा सहित एक आयशर ट्रक मधून खाली असलेल्या प्लास्टिक कॅरेट खालून ४३५ कि.वजनाचा गांजा जप्त केला आहे.तसेच आयशर ट्रक व ट्रकचा आजूबाजूला माहिती देण्यासाठी वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्या आहेत.एकूण ७४ लाख २० हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव,उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुररेल्वे जितेंद्र जाधव,पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा तपन कोल्हे,पोलीस निरीक्षक नितीन चुलपार,संतोष मुंदाणे,रविंद्र बावणे,बळवंत दाभने,पंकज फाटे,दिनेश कनोजिया,मूलचंद भांबुरकर,मोहन मोरे,अमोल देशमुख,विलास रोकडे,निलेश डांगोरे नितीन कळमकर,प्रमोद शिरसाठ यांनी केली आहे.