दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : मनसे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी नवा मोंढा पोलीसांनी एका काल आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवार, दि. ४ सप्टेंबर २२ रोजी मध्यरात्री शिवराम नगरात मित्रांबरोबर झालेल्या वादावादीचे प्रकरण थेट गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यापर्यंत पोहोचले गेले. त्यानंतर उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले असता तेथे सचिनचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटना घडल्यानंतर आरोपीने पोबारा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
याप्रकरणी मयत सचिनचा भाऊ संदीप पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नवा मोंढा पोलिसांनी विजय मारोतराव जाधव या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध तुकड्या तैनात केल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. संदीपान शेळके हे स्वतः करीत आहेत. एकूणच या प्रकारामुळे शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.