दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सुशांत सिंह राजपूत याची हत्या – अशा स्वरुपाचे वक्तव्य आमिर खान याचा भाऊ फैसल खान यांनी केले
मुंबई : फैसलने केलेल्या एका वक्तव्याची भरपूर चर्चा सुरू आहे. फैसलचे चर्चेत असलेले वक्तव्य बॉलिवूडचा अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्या विषयीचे आहे.
सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली अशा स्वरुपाचे वक्तव्य फैसलने केले. फैसलच्या या वक्तव्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू कसा झाला याबाबतच्या चर्चेला नव्याने उधाण आले.
बिग बॉस या रिअॅलिटी टीव्ही शो मध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर आली होती पण ती ऑफर मी नाकारली असे फैसलने सांगितले. यानंतर टाइम्स नाउ नवभारतच्या डिजिटल टॉक या कार्यक्रमात फैसलला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना फैसलने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी त्याचे मत व्यक्त केले होते. आमिर खानच्या भावाने डिजिटल टॉक या कार्यक्रमात बोलताना खान कुटुंबातील वाद, बॉलिवूड बायकॉट, बॉक्स ऑफिस आणि सुशांत सिंह राजपूत या विषयांवर त्याचे मत मांडले. सुशांतचा मृत्यू झाला नाही त्याची हत्या करण्यात आली असे फैसल म्हणाला. तपास सुरू आहे आणि सत्य बाहेर येईल, असा विश्वास फैसलने व्यक्त केला.
मेला या हिंदी सिनेमातून प्रकाशात आलेल्या फैसलला नंतर कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागले. कोर्टात जाऊन केस जिंकल्यानंतर फैसला त्याचे हक्क मिळाले. यानंतर सिनेमात भूमिका करणे सोडून फैसलने स्क्रिप्ट रायटिंग सुरू केले. पण सध्या तो सुशांत विषयी बोलल्यामुळे चर्चेत आहे.