दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी.-संभाजी गोसावी
सातारा : सातारा,कोल्हापूर,बडोदा येथील राजघराणे उपस्थिंत होते. नातू कौस्तुभराजे यांनी मुखाग्नी दिला. सातारा जिल्ह्यांतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ वंशज आणि सातारा राजघराण्यांतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य बॅडमिटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. सातारच्या राजघराण्यांतील जेष्ठ सदस्य श्रीमंत.छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनांमुळे अवघा सातारा गलबलून गेला होता. त्यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळत होता त्यांच्या जाण्यांने सामाजिक न्यायांचा आधारवड निघून गेला आहे. सातारकरांच्या न्याय मंदिरातील एक दैवत हरपले अशा भावना सर्वसरातून व्यक्त होत होत्या. साताऱ्यातील राजघराण्यांतील श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले हे राजघराण्यांतील पहिले नगराध्यक्ष होते त्यांनी सातारच्या विकासांच्या अनुषंगाने उल्लेखनीय काम केले त्यानंतर ७ मार्च १९९७ ते १५ मे १९८५ या कालावधीत प्रशासकीय कारकीर्द राहिली ती संपल्यानंतर श्रीमंत. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे साताऱ्यांचे नगराध्यक्ष झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपला चांगला ठसा उमटवला होता. १५ मे १९८५ ते १६ डिसेंबर १९९१ असं त्यांचा कार्यकाळ राहिला या कालावधीत शिवाजीराजे भोसले यांनी लोकहिताचे कामे केली. शांत,स्वयंमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे साताऱ्यांचे राजे श्रीमंत. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ साली झाला. साहित्य कला क्रीडा संस्कृती सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्षे शाहूनगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली चांगलीच कारकीर्द गाजविली होती. सातारच्या राजघराण्यांतील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते. त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यांतील वरत्व संपविण्यांचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता हे सातारकर कधीच विसरु शकत नाहीत. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारांस पुणे येथील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव अदालत वाड्यांत आणण्यांत आले.बुधवारी सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा जिल्हासह, परजिल्ह्यांतील राजकीय,सामाजिक धार्मिक शैक्षणिक तसेच सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह, सातारा जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अशा विविध क्षेत्रांतून मान्यवरांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी एक वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सातारा येथील संगम माऊली या नदी काठावर अनेक राजकीय सामाजिक धार्मिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.