दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नांदेड. जिल्ह्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदाचा पदभार खुशालसिंग परदेशी यांच्याकडे तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सोपवून नागपूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यासांठी इटणकर हे रवाना झाले होते. तसेच नांदेड जिल्ह्यांला जिल्हाधिकारी कोण येणार याबाबत गेले दोन महिन्यांपासून महसूल विभागात चांगलीच चर्चा रंगत होती तसेच जिल्हाधिकारी पदासाठी अनेक अधिकाऱ्यांची नावे ही समोर आली होती. मात्र नावांमधील वगळताच नवा चेहरा समोर आला.जळगांव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून गुरुवारी रात्री उशिरा बदली करण्यांत आली. राज्यांत आता सध्या शिंदे आणि फडवणीस हे सरकार असल्यांने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मात्र सत्र सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे २०१३ मधील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी म्हणून कामकाज पाहिले होते त्यानंतर सांगली जिल्ह्यांतूनच त्यांची जळगांव जिल्हाधिकारी पदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये बदली झाली होती. गुरुवारी सायंकाळी उशिरा शिंदे-फडवणीस या सरकारने राज्यांतील जवळपास ४४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या. तसेच बदल्या आदेशांत नियुक्ती ठिकाणी पदभार घेण्यांचेही आदेश नमूद केले होते.