दैनिक चालू वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
निळेगव्हाण :- नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथे अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तेंव्हा सर्व साधुसंत व भाविक भक्त मंडळींना कळवण्यात येते की श्री. संत तपोनिधी आनंदबन महाराज गुरु केवळबन महाराज व श्री संत गुरुवर्य उदत्तबन महाराज गुरु आनंदबन महाराज यांच्या व भगवान दत्तप्रभू यांच्या कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता सोहळ्याचे आयोजन दिनांक ७ नोव्हेंबर 2022 रोज सोमवारी आयोजित केलेले आहे. तसेच श्री. संत तपोनिधी आनंदबन महाराज यांच्या समाधीचा सकाळी १०:३० वाजता अभिषेक व नंतर महाप्रसाद होईल.श्री 10८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या शुभहस्ते दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोज सोमवारी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत महापुजा व काकडा आरती होईल.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.महाप्रसादाची वेळ दुपारी १२ ते आपल्या आगमनापर्यंत राहील. भजनी मंडळ, आनंद सांप्रदाय भजनी मंडळ बेंद्री व श्री गुरुमूर्ती आनंदबन महाराज भजनी मंडळ निळेगव्हाण हे राहतील. कार्यक्रमाचे स्थळ श्री. दत्त संस्थान निळेगव्हाण येथे असून या कार्यक्रमाचे आयोजक श्री संत गुरू आनंदबन महाराज गुरु उदत्तबन महाराज श्री. दत्त संस्थान निळेगव्हाण व समस्त गावकरी मंडळी निळेगव्हाण ता. नायगाव (खैरगाव) जिल्हा नांदेड यांनी केले आहे.तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.