दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी गोंदिया- संभाजी गोसावी. जिल्ह्यांतील अर्जुनी-मोरगांव तालुक्यांतून एक अतिशय मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे. नेवगावबांध येथील नवोदय विद्यालयांतील सहावीच्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल खेळत असताना या विद्यार्थ्याला भोवळ यानंतर या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्यांची घटना घडली आहे. संगम खिलेश्वर गोपचे ( वय ११ ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत गोंदिया जिल्हा पोलिस दलाकडूंन मिळालेल्या माहितीवरुन हा विद्यार्थी गोंदियांच्या सोनी येथील रहिवासी होता. नेवगावबांध येथील नवोदय विद्यालयांतील संगम गोपचे हा विद्यार्थी विद्यालयांच्या मैदानावर आपल्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळत होता. दरम्यान खेळत असताना त्याला भोवळ आल्यांने तो मैदानातच खाली कोसळला. लगेच विद्यालयांच्या शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेण्यांत आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान त्याचा हृदयविकारांने मृत झाल्यांचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडूंन मिळाली.