दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनीधी- सुरेश जमदाडे
मुखेड सा.वा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंधेरी पूर्व येथील विधानसभा पोटनिवडणूकीतील उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांचा तेराव्या फेरी अखेर 48015 मतांनी विजयी होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.
अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार लटके यांचा विजय होताच शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येवून शहरातील मुख्य चौका चौकात फटाके फोडून जल्लोष करत पेढे वाटले त्या नंतर गगन भेदी घोषणानी शहर हदरून गेले यावेळी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, जिल्हा संघटक शंकर पाटील लुटे,तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, भागवत जाधव, मा.जि.प.सदस्य बालाजी बंडे, शिवाजी गेडेवाड,युवासेनेचे बालाजी ढोसणे,बापुराव कांबळे,शहरप्रमुख शंकर चिंतमवाड,उपतालुका प्रमुख शंकर पिटलेवाड, शामसुंदर शिंदे,माधव पडलवार,पंढरी मुकिंदवाड,माधव देवकते,कैलास राहेरकर,संजय पाटील लादगेकर,आदिंची उपस्थिती होती.