दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगर परिषद कार्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व उस्ताद लहुजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर उस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले,
नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक बालाजी शेळके कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, जेष्ठ कर्मचारी माधव पाटील पवार, शेषराव भिसे,अंकले, वैजनाथ शेटे, विष्णू भिसे, हरी धुतमल, शंकर वाघमारे, यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांनी पंडित जवाहरलाल नेहरू व उस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन केले.