दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरातील शहाजीनगर भागातील प्रयागराज हॉस्पिटल येथील मेडिकल मध्ये अनेक दिवसापासून कामावर असलेल्या युवकाने ३१ डिसेंबर रोजी रात्री जुन्या पंप हाऊसजवळ साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
किरण मक्काजी कुरुळेकर (वय २८, रा. पोच्चमबेस गल्ली, देगलूर) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुन्या पंप हाऊसजवळील पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या लोखंडी पुलास साडीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.प्रकरणी १ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत युवकाचे नातेवाईक देगलूर पोलिस ठाण्यात सकाळी ११ वाजता जमले होते.
अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याने पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले देगलूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले.
दरम्यान, किरण कुरुळेकर याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, हे मात्र गुलदस्तात च आहे. या घटनेच्या तपासात कारण पुढे येण्याची शक्यता आहे.