दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
पत्रकारितेची पायाभरणी करणारे ,दर्पणकार तथा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे पत्रकारितेचे ” जनक ” दर्पणकार”बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी” दर्पण ” हे मराठीतील पहिले नियतकालिके सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती.त्यांचे स्मरणात आजचा हा दिवस सर्वत्र ” दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी मराठी पत्रकारितेचे जनक ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ यांच्या जयंती निमित्त कंधार पोलिस स्टेशन मध्ये दर्पण दिन साजरा व पत्रकारांचा सन्मान सोहळा ठेवण्यात आला .
जो पत्रकार बांधव स्वतः आपल्या परिवारची चिंता करत कठीण परिस्थितीत आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आरसा ठरुन सामाजिक बांधिलकी जोपसतो अशा पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व सन्मान सोहळा कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक राम पडवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व माध्यमाच्या पत्रकारांचा ६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त व महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार दिनकर जायभाये सर होते तर सुत्रसंचलन जी.सी. इंद्राळे साहेब यांनी केले .
त्यानंतर पत्रकारांचा सन्मान कंधार पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पडवळ साहेब व पोलीस उपनिरीक्षक जी सी.इंद्राळे साहेब यांच्या हस्ते डायरी ,पेन ,गुलाबाचे फुल देऊन सर्व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला..
यावेळी पोलीस विभागाचा वर्धापन दिन व पत्रकारांचा ६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असल्याने पोलिस आणि पत्रकारामध्ये नातं मैत्रीच असावे असे आवाहन राम पडवळ यांनी केले .
या सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे , पोलीस उपनिरीक्षक गणाचार्य , तुकाराम जुने , शेख इमरान , दिगंबर भंडारे , महागावकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौतम कांबळे आदीसह पोलीस बांधवांची उपस्थिती होती .
या सत्कार कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. दिगंबर गायकवाड , वाघमारे डी जी , सत्यनारायण मानसपुरे , मोहम्मद अनसारुद्दीन , माधव भालेराव , एस पी केंद्रे , राजरत्न गायकवाड , विश्वंभर बसवंते , महंमद सिकंदर , दयानंद कदम , सय्यद हबीब , राजेश्वर कांबळे, विश्वंभर बसवंते ,माधव गोटमवाड , धोंडीबा मुंडे , ॲड.उमर शेख , सिद्धार्थ सर व आदी सह शहरातील पत्रकारांची उपस्थिती होती.