दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे अंतेश्वर येथे कै.भीमराव पाटील कराळे यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुप्रसिद्ध रामायणचार्य हभप श्री रामरावजी महाराज ढोक यांचा भव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दोन तास चाललेल्या सुप्रसिद्ध रामाणाचार्य हभप श्री रामराव ढोक महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून रामायण कथा सह चालु घडामोडी आदी विषयांवर सविस्तर प्रबोधन केले.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे , माजी आ.रोहिदास चव्हाण , जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हाके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे , संजय घोगरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार, आंबेसांगवीचे सरपंच विक्रम कदम, युवा नेते धीरज भैया हाके, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, पत्रकार विलास सावळे, पत्रकार शिवराज पाटील पवार,
कै. भीमराव किशनराव पाटील कराळे यांचे पुत्र रावण पाटील कराळे, गणपती पाटील कराळे, गणपती पाटील कराळे, बालाजी पाटील कराळे, मधुकर पाटील कराळे, माजी नगरसेवक शंकर पाटील कराळे, माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे , नातू वर्षकेतू पाटील कराळे, कैलास पाटील कराळे, विलास पाटील कराळे, गजानन पाटील कराळे शिवशंकर सुर्यकांत पा कऱ्हाळे , यांच्यासह अंतेश्वर,पेनूर, बोरगाव,आडगाव, भारसावडा, लोहा ,कंधार,पालम, पुर्णा तालुक्याहीत नांदेड व परभणी जिल्ह्यातील भाविक भक्त, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
तसेच हभप श्री रामरावजी महाराज ढोक यांचा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हजारो भाविक भक्तांनी गोड,स्वादिष्ट व रुचकर महाप्रसादाचा लाभ घेतला.
तसेच कै. भीमराव पाटील कराळे २४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अंतेश्वर येथे भव्य रक्तदान व नेत्रदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या रक्तदान व नेत्रदान शिबीरांला मोठा प्रतिसाद मिळाला असुन १०० जणांनी नेत्रदान केले तर ४० जणांनी रक्तदान केले.