दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील हणेगाव परिसरातील व मौजे खुतमापूर येथील युवा कार्यकर्ते तथा खुतमापूर उपसरपंच बालाजी इंगळे पाटील यांनी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश करीत हातात शिवबंधन बांधून घेतली.
मागील कित्तेक वर्षांपासून बालाजी इंगळे पाटील व त्यांचे मोठे बंधू दत्ताजी इंगळे पाटील यांनी आपल्या आगळावेगळा ठसा उमटविला असून एक दानशूर म्हणून या व्यक्तीचे नाव घेतले जाते. मागील दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीने संपूर्ण देशावर हाहाकार माजला असताना अनेक गरीब कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर पडले असतानाबालाजी इंगळे पाटील यांनी गोरगरीब कुटूंबाला सावरण्यासाठी रस्त्यावर उतरून त्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी मेहनत घेतली होती मागील विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ हणेगाव सर्कलची धुरा समर्थपणे बालाजी इंगळे यांनीच सांभाळली होती तर स्वताच्या कोरले. वाढदिवसानिमित्त क्रिकेटचे खुले सामन्याचे आयोजन करणे, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करणे, व प्रत्येकाच्या अडीअडचणी
सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणे, हणेगाव येथील सिद्धेश्वर मंदिर व मारोती मंदिराच्या बांधकामासाठी अकरा लाख रुपयाची निधी व राममंदीर बांधकामासाठी तीन लाख रुपयाची निधी देऊन या भागात एक दानशूर व्यक्तीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानावर स्वताचे२०२३ रोजी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत नांदेड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख चवनराव धोरात जिल्हाप्रमुख दत्ता पाटिल कोकाटे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील इंगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर शिवसेना शहरप्रमुख
बालाजी मेलागिरे करडखेड येथील शिवसेना पक्ष प्रवेशाने अनेक बालाजी लोलपे आदीसह नांदेड दिग्गजांचे पाबे दणाणले असून जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित