दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- एक दहा चाकी ट्रक नांदेड येथून भरोच गुजरातकडे जात आसतांना
झिरो फाट्याजवळ त्या गाडीचे टायर फुटले आणि त्या आवाजाने वाहन चालक हरपलसिंग यांना हृदयविकाराचा झटका आला.गाडी थांबून वाहन चालक रस्त्यावर पडला असता.तेथून परभणीचे शिक्षक रामेश्वर वकदे सर वसमत कडे जात असताना त्यांनी ट्रकच्या बाजूस पडलेल्या व्यक्तीला पाहिले व त्या वाहन चालकाची मदत करण्यासाठी गेले असता वाहन चालक हरपालसिंग यांना हृदयविकाराचा झटका आला हे त्यांच्या लक्षात आले.त्याच वेळेस 108 ॲम्बुलन्स नांदेडहून परभणीकडे येत असता ॲम्बुलन्सच्या मदतीने डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्या दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी भर्ती करण्यात आले.त्या नंतर रामेश्वर वकदे सरांनी परभणी येथील वाहन चालकांना या घटने बद्दल माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच.जय संघर्ष ग्रुप परभणी जिल्हा संपर्क प्रमुख श्री.गौतम क्षिरसागर जय संघर्ष ग्रुप, परभणी जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश बायस,राम कदम, सचिन वाकळे,भदर्गे मामा,सुरेश लाड,दिलीप दुधाटे, किशोर भोसले,गोविंदा,रामेश्वर अवचार,विशाल खंदारे, भगवान कचवे,निलेश बोके,बंटी सोनवणे हे सर्व वाहन चालक रुग्णालयामध्ये पोहोचले आणि सतत तीन दिवस हरपालसिंग यांच्यावर उपचार केल्यानंतर वाहन चालकाच्या तब्येती मध्ये सुधारणा झाली.तत्पुर्वी हरपालसिंग यांच्या सूचने वरूण वाहनाचे मालक व ट्रान्सपोर्ट चालक यांच्याशी संपर्क करण्यात आला.तेव्हा त्या वाहन चालकाला कोणतीही मदत मिळाली नाहि.उलट ट्रान्सपोर्ट चालकाने नांदेड येथून दुसरा ड्रायव्हर पाठवून सदरचा ट्रक परस्पर नेला गेला. संबंधित रूग्णाचे हाँस्पीटलचे व मेडिकलचे बील हे संघर्ष ग्रुपच्या वाहन चालकांनाच भरणे आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी त्यांच्या फीचे पैसे घेतली नाहीत व निस्वार्थपणे सेवा दिली.तसेच मेडिकलचे देखील तब्बल 50 हजार रूपये बील झालेले आसतांना फक्त 30 हजार रूपये घेऊन फार मोठे सहकार्य केले. त्याबद्दल जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांनी वरील सर्वांचे आभार मानुन सर्वांना धन्यवाद दिले.
{ परभणी येथील संघर्ष ग्रुपच्या सर्व चालकांनी तन,मन,धनाने मदत केल्या बद्दल हरपालसिंग यांनी गावी पोहचल्या नंतर संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेबांना फोन करूण सर्वांचे आभार माणले व मालक आपल्या जिम्मेदारी पासून हात झटकतात आशा मालकाकडे नोकरी करू नये आसे ड्रायव्हर लोकांना आव्हान केले }