दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील ११ वाळुपट्टयांतून ७० हजार ब्रास वाळु उपसापोटी साडेचार कोटींचा रुपयांचा महसूलचे उदिष्ट प्राप्त होणार आहे.
मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील लिंबखेडा – कानडी, दुधा – टाकळखोपा, देवठाणा – उस्वद – खोरवड, देवठाणा – उस्वद, वाघाळा – किर्ला , इंचा – सासखेडा, टाकळखोपा – किर्ला , देवठाणा – उस्वद २ , कानडी – उस्वद , वाघाळा – भुवन- पोखरी केंधळे या वाळु पट्टयांत ७१ हजार ६१९ ब्रास वाळू उपसापोटी ४ कोटी २९ लाख ७१ हजार ४०० रुपयांचा महसूल मिळणार आहे. या लिलावासाठी प्रथम फेरी १७ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान ई-निविदा व ई-लिलाव या दोन्ही पध्दतीने राबविली जात आहे. या वर्षासाठी वाळु उत्खननासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही मुदत असणार आहे .
लिलावनंतर वाळूचोरी थांबणार ?
दरम्यान अनेक महिन्यांपासून हे वाळू घाट लिलावाच्या प्रतीक्षेत होते. त्यांतच लिलाव लांबणीवर व नदीपात्र कोरडे पडल्याने वाळू माफियांकडुन अवैध वाळू उत्खननासाठी हलचालीला वेग आला होता. असे असले तरी वाळूचोरीविरुध्द जालना अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पीनाटे , परतुरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व उस्वद सज्जाचे तलाठी नितीन चिचोले यांनी वेळोवेळी संबंधितांविरुद्ध कारवाई करत २७ लाख ५५ हजारांचा दंड वसूल केला.
कोणत्या वाळूपट्टयांत वाळू ब्रास व सरकारी किंमत किती ?
वाघाळा- किर्ला या वाळुपट्टयांत ६ हजार ७१३ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ४० लाख २७हजार ८०० एवढी आहे . देवढाणा-उस्वद या वाळुपट्टयांत ६ हजार १८३ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ३७ लाख ०९ हजार ८०० एवढी आहे . लिबखेडा -कानडी या वाळुपट्टयांत ८ हजार ८३३ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ५२ लाख ९९ हजार ८०० एवढी आहे . दुधा- टाकळखोपा या वाळुपट्टयांत २ हजार ९६८ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. १७ लाख ८० हजार ८०० एवढी आहे . देवठाणा -उस्वद- खोरवड या वाळुपट्टयांत ४ हजार २४० ब्रास वाळू उपशासाठी सरकारी किंमत २५ लाख ४४ हजार एवढी आहे. भुवन -शिरपुर या वाळुपट्टयांत ५ हजार ६५३ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ३३ लाख ९१ हजार ८०० एवढी आहे . इंचा-सासखेडा या वाळुपट्टयांत ७ हजार ६७ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ४२ लाख ४० हजार २०० एवढी आहे . किर्ला – टाकळखोपा या वाळुपट्टयांत ५ हजार ९३६ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ३५ लाख ६१ हजार ६०० एवढी आहे . देवठाणा – उस्वद २ या वाळुपट्टयांत ४ हजार ९४६ ब्रास वाळू उपशासाठी स. किं. २९ लाख ६७ हजार ६०० एवढी आहे . कानडी -उस्वद या वाळुपट्टयांत १० हजार ६०० ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ६३ लाख ६० हजार एवढी आहे . वाघाळा – भुवन – पोखरी केंधळे या वाळुपट्टयांत ८ हजार ४८० ब्रास वाळू उपशासाठी स. किं. ५० लाख ८८ हजार एवढी आहे .