दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना समाजातील सर्व बांधवांना एकत्र आणून सर्वांचा विकास घडवून समाजाचा विकास घडवण्याचा सिद्धांत महाराजा अग्रेशन यांनी दिलेला आहे असे रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी जालना जिल्हा येथे दौऱ्यावर असताना त्यांना एडवोकेट महेश धन्नावत व स्थानिक महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष एडवोकेट अश्विनी धन्नावत महाराजा अग्रेसर यांच्यावरील लिहिलेली पुस्तक भेट देताना केली. त्यावेळी महिला आयोगाचे सदस्य एडवोकेट संगीता ताई चव्हाण, जालना जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष स्वप्निल खरबे, व माजी नगरसेवक एडवोकेट रोहित बनवस्कर उपस्थित होते.