दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- नांदेड,सोनखेड, कलंबर, चिखली फाटा,बारूळ, पेठवडज,मुखेड, उदगीर मार्ग,बिदर या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून कामाला सुरुवात करण्याची मागणी वरील सर्व रेल्वेमार्गावरील व भागातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी असून हा भाग रेल्वे मार्गापासून अनेक वर्षांपासून उपेक्षित आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेल्या अच्छे दिन या घोषवाक्या प्रमाणे या भागातील जनतेच्या व या भागातील व्यापारी बांधवांच्या दृष्ट्या हा रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा असून दोन राज्यांना कमी अंतराने जोडला जाणारा मार्ग असून धार्मीक प्रेक्षणीय स्थळे मंदिरे आहेत.श्री संत गुरु गोविंदसिंग गुरूद्वारा नांदेड,साखर कारखाना कलंबर,मन्याड धरण बारूळ, सिद्धिविनायक मंदिर पेठवडज , ज्वाजल विरभद्र मंदिर मुखेड, किल्ला उदगीर, गुरूद्वारा बिदर तसेच प्रसिद्ध नर्सिंंह मंदिर ही धार्मिक स्थळे या नवीन रेल्वे मार्गाने जोडले जाणार असून या धार्मिक स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत सोयीचा व जवळचा मार्ग नांदेड -बिदर आहे.त्यामुळे नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवेदन देऊन या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून कामाला सुरुवात करण्याची मागणी जाधव व्यंकटी,कंधारे पांडूरंग, जाधव गजानन,टेंबुलवार प्रकाश, गायकवाड शरद, गायकवाड बळीराम यांनी केली आहे.