दैनिक चालु वार्ता देगलुर प्रतिनीधी –
देगलूर: देगलुर तालुक्यात सर्वात मोठं लोकवस्ती व बाजारपेठेच गाव म्हणजे हाणेगाव हे गाव तीन राज्याच्या सिमेवरती वसला असुन येथे परिसरातील आनेक लोकांचा उदरनिर्वाह बरोबर व्यापारीक हेतुने येणंजाणं असतोच येथुन जवळच असलेल्या शिळवणी जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असुन डांबर रोडच दिसणार नाही जर एकांदी मोठी वाहन रस्त्यावरुन गेल्यास संपुर्ण धुराळाच धुराळा उडताना दिसतो आहे या मार्गे उदगीरला जाणारा जोड रस्ता असुन या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वरदळ असते पण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे याच रस्त्यावर प्रा.आ.केंद्र,एम.एस.ई.बी.पशुवैद्यकीय दवाखाना,इंग्लिश मेडीयम स्कुल आदी कार्यालय आहेत आणि
हाणेगाव परीसरातील जवळपास तीस गावचे लोक आपलं व्यपारीक शैक्षणिक कृषीविषयक बांधकाम आदी कामानिमीत्त रोज ये-जा करत असतात पण परीसरातील रस्त्याच्या समस्यांकडे कोणताच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आजही परीसरातील संपुर्ण परिस्थिती दुर्लक्षीत आहे जर शिळवणी व परीसरातील वाडी तांड्याच्या लोकांचा रात्री बे-रात्री दवाखाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे जर पावसाळ्यापूर्वी शिळवणी हाणेगाव रस्त्याचं काम नाही झाल्यास लोकांना पायी चालनं ही कठीन होईल. यात दुचाकी वरुन जाताना गाडी स्लीप होऊन पडण्याचे प्रमान वाढले आहेत या रस्त्याकडे लोकप्रतिनीधी आणि संबंधीत बांधकाम विभाग याकडे वेळीच लक्ष देण्याची गरच असल्याची चर्चा नागरीक करतांना पाहावयास मिळते आहे.