दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात सर्व महिलांना राज्य महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत जाहिर केली आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च पासून सुरु झाली आहे. सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेत 17 ते 22 मार्च 2023 या कालावधीत एकूण 1 लाख 42 हजार 430 महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून प्रवास करणाऱ्यानिमआराम, विना वातानुकुलित, शयन-आसनी, शिवशाही, हिरकणी, शिवनेरी, शिवाई आदी बसमध्ये ही प्रवास सवलत लागू आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 आगारात महिलांनी आतापर्यंत पुढीलप्रमाणे महिला सन्मान योजनेत लाभ घेतला आहे.
नांदेड आगारात 20 हजार 868, भोकर आगारात 13 हजार 989, किनवट आगारात 10 हजार 372, मुखेड आगारात 17 हजार 533, देगलूर आगारात 15 हजार 728, कंधार आगारात 21 हजार 950, हदगाव आगारात 13 हजार 241, बिलोली
आगारात 20 हजार 236, माहूर आगारात 8 हजार 513 असेएकूण 1 लाख 42 हजार 430 महिला प्रवाशांनी बस प्रवास दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे