दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- 30 एप्रिल रोजी होणाऱ्या अहमदपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा किसान विकास पॅनलचा शुभारंभ तालुक्यातील जाज्वल्य असलेल्या परचंडा येथील रोकडोबा देवस्थान समोर करण्यात आला.
या प्रचार शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.किशन महाराज परचंडेकर हे होते. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष अँड.भारत चामे,काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम, त्र्यंबक आबा गुट्टे, माजी सभापती हरिभाऊ येरमे, अँड.आर.डी.शेळके,जिवणकुमार मद्देवाड, प्रविण रेड्डी, भाजपचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, अँड.अमित रेड्डी, विठ्ठलराव बोडके, कमलाकर पाटील, निळकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, व्यंकट पाटील, राहुल शिवपुजे, रामभाऊ नरवटे, शेषेराव राठोड,इतिराज केंद्रे, बाबुराव बावचकर, रामभाऊ बेल्लाळे, सुधीर गोरटे , देविदास सुरनर,कुलदिप हाके, अनिल शेळके,व्यंकट दहिफळे, बालाजी गुट्टे, हेमंत गुट्टे, गोविंद बैकरे, शिवकुमार कदम, शिवशंकर हिप्परगे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, निखिल कासनाळे, अँड.किशोर कोरे, परमेश्वर सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, प्रदीप खोमणे,केरबा कांबळे, जितेंद्र मोरे, यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.
सदरील प्रचार शुभारंभ प्रसंगी खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, अँड.भारत चामे,जिवणकुमार मद्देवाड यांनी आपली मनोगत व्यक्त करुन अहमदपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किसान विकास पॅनलला बहूमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.