दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
____________________________
लोहा येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक बी. डी .जाधव यांची संस्थेने उप मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती केली आहे कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे क्रीडा शिक्षक व बाणेदार स्वभावाचे बिडी जाधव हे डिसेंबर 1990 मध्ये श्री संत गाडगे महाराज विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले जुलै 2016 मध्ये त्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आता त्यांचे संस्थे अंतर्गत कंधार येथे उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम धोंडगे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे साहेब सहसचिव ॲड. मुक्तेश्वर धोंडगे यांनी त्यांना पदोन्नती दिली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्र तथा श्री शिवाजी जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाडसर पर्यवेक्षक माधवब्याळे सर प्राध्यापक घोरबांड सर यांनी त्यांचा सत्कार केला