अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रत्येक वर्षी एक ना एक विद्यार्थी नवोदय यश प्राप्त करतो ही धनगर पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेची परंपरा आहे या परंपरेला पुढे चालू ठेवण्याचे काम या शाळेचे विद्यार्थी करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची एक ध्येय असतं नवोदयाला लागण्यासाठी परंतु स्पर्धा परीक्षा आणि कॉम्पिटिशन मुळे काही मुलांना अपयश प्राप्त करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना मानव अनिल ढवळे हा विद्यार्थी नवोदय महाविद्यालय आंबा( परतुर ) येथे निवड झाली आहे. या यशस्वी बद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व यामुळे मानव ढवळे हा विद्यार्थी शाळेत प्रत्येक खेळात कोणतेही परीक्षेत यश प्राप्त करण्याचे हे मानवचा एक ध्येय व नवोदयला लागण्याचे ध्येय मानव मध्ये होतं.
या यशाबद्दल सर्व मित्रमंडळी व विद्यार्थी गावकरीच्या व शिक्षकांना वतीने मानव चे कौतुक होते आहे विशेष म्हणजे तो आपल्या यशाची सर्व श्रेय आई वडील व शाळेचे शिक्षक वृंद यांना दिले.व मानसच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्याचे मित्र मंडळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.व शिक्षक वृंद व गावकऱ्यांच्या वतीने मानवचा सत्कार करण्यात आला…