दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
लाखो रुग्णांना बरे करणारे लाखों रुग्णाचा विश्वास संपादन करणारे रुग्णांने देवदूत मानलेले लोहयाचे लाडके डॉक्टर डी. बी.कानवटे साहेब (काकाजी) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
लोहा शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवकल्याण नगर येथे डॉ. डी.बी. कानवटे साहेब यांचे रुग्णालय असुन येथे लोहा शहरासहीत लोहा , कंधार, पालम तालुक्यातील असंख्य रुग्ण हे आजारी पडल्यानंतर आजारातून बरे होण्यासाठी डॉ. डी.बी.कानवटे साहेबांकडे मोठ्या विश्वासाने येतात. डॉ. कानवटे साहेब हे रुग्णांच्या विश्वासा तडा न जाऊ देता त्यांच्यावर योग्य उपचार करुन रुग्णांना ठणठणीत करतात.
डॉ. कानवटे साहेब यांचे वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण झाले असुन त्यांची डिग्री एमबीबीएस एम एस आहे त्यांनी शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक म्हणून दिर्घ काळ रुग्णांची सेवा केली. ते आपल्या लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते व त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन पुढे लोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक झाले.
ते लोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असताना लोहाच्या ग्रामीण रुग्णालयाला सतत तीन वेळेस डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. डॉ. कानवटे साहेब हे लोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असताना या सरकारी दवाखान्यात हजारो- लाखो येत होते त्यांना सर्व सोयी सुविधा योग्य उपचार मिळत होता शासनाच्या अनेक योजना ते राबवीत होते ग्रामीण रुग्णालयात शिस्त होती, स्वच्छता होती, त्यावेळी सर्व डॉक्टर हे मुख्यालयी राहत होते . डॉक्टर कानवटे साहेब स्वतः दिवस – रात्र गोरगरीब शेतकरी शेतमजूर यासह सर्वच रुग्णांची तपासणी करीत होते त्याच्यावर उपचार करीत होते. डॉ. कानवटे साहेब हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला घरघरं लागली आहे सर्व सेवा विस्कळित झाली आहे.
डॉ.कानवटे साहेब सेवानिवृत्त झाल्यानंतर ही घरी आराम करीत बसले नाहीत. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांनी आपली खाजगी प्रॅक्टिस शिवकल्याण नगर येथे सुरू ठेवली आहे .
अगदी माफक दरात गोरगरीब रुग्णांना ते सेवा देत आहेत एखादा गंभीर आजार असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करुन पुढील उपचारासाठी नांदेड -औरगाबादला पाठवितात शक्यतो त्यांच्यावर लोहा येथील त्यांच्या रुग्णालयात उपचार करतात.आज काल अनेक रुग्णालये, डॉक्टर, पॅथॉलॉजी सेंटर हे केवळ व्यवसाय करण्यासाठी तयार झाले आहेत रुग्णसेवा कमी व उत्पन्न जास्त करीत आहेत रुग्णाला योग्य मार्गदर्शन उपचार न करता त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विनाकारण अनेक तपासण्या करायला लावत आहेत रुग्णाची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट करीत आहेत हे कुठे तरी थांबले पाहिजे.
या या रुग्णालयानी , डॉक्टरांनी डॉक्टर कानवटे साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा त्यांना प्रेरणास्थान म्हणावे गोरगरीब जनतेची सेवा करावी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानावी आज डॉ. कानवटे साहेब हे सेवानिवृत्तीनंतर ही गोरगरीब जनतेची सेवा करतात अनेक रुग्णांना जीवदान देतात त्यांच्या वर योग्य उपचार करतात त्यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत
डॉ. कानवटे साहेब हे देव नाहीत पण देवा पेक्षा काही कमी नाहीत असे अनेक रुग्ण म्हणून दाखवितात देवदूत असलेले डॉ. कानवटे साहेब यांचा आज दि.२५ एप्रिल रोजी वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा
सचिन मुकादम (चव्हाण)
लोहा