दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली ता. इंदापूर येथे महात्मा फुले विद्यापीठ राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत शेटफळ हवेली येथे कृषि सल्ला केंद्रातील कृषिदुतां मार्फत कृषि दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला कृषि दिनाच्या दिवशी शेटफळ हवेली येथील सरपंच सौ. रुपाली संतोष पवार, उपसरपंच श्री.सचिन ज्ञानदेव शिंदे ,श्री.निवृत्ती तुळशीराम शिंदे, सौ.सुनीता शिंदे ,श्री.शिवाजी शिंदे, कृषि अधिकारी श्री.अतुल जावळे, शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख श्री. नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांना बोलावून चर्चासत्र व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह पाटील रत्नाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर जी नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एम. एकतपुरे यांच्या मार्गदर्शनानुसार शेटफळ हवेली कृषि सल्ला केंद्राचे कृषि दूत अभिषेक तावरे, वेदांत पाटील, अरबाझ शेख, लिंगराज चनागोंड, विशाल शिंगाडे, सौरभ चौरे,महांतेश कनकनवाडी यांनी गावातील मोकळ्या मैदानात पाहुण्यांच्या हस्ते जांभूळ, आंबा ,लिंब या वृक्षांची लागवड केली त्याचप्रमाणे ग्रामस्थांना उपयुक्त अशी वेगवेगळ्या फळांच्या वृक्षांची रोपे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे कृषी दुतांनी वृक्ष लागवडीचे फायदे लागवड करण्यासंबंधी महत्त्वाच्या खड्डे किती प्रमाणात घ्यावे, खते कोणती वापरावी, पाण्याची व्यवस्था कशी करावी यासंबंधी चर्चा करून मार्गदर्शन केले वृक्ष व पर्यावरण यांचा संबंध व महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले कृषि अधिकारी श्री .अतुल जावळे आपल्या भाषणात शेटफळ येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपणाचे महत्व सांगितले आणि या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमास गावातील कृषी दूत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.