दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नाशिक (दि.18) – ’इंद्रधनुष्य’ 2022-2023 या सांस्कृतिक महोत्सवासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.
मा. राज्यपाल कार्यालयामार्फत आदेशित करण्यात आल्यानुसार ’इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येते. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ 2022 – 2023 करीता विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. विद्यापीठ मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत आयोजित उद्घाटन कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बी. आर. पेंढारकर आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेच्या परिक्षणाकरीता अॅड. अश्विनी देशपांडे, प्रा. मनिषा भामरे, श्रीमती मोनालिसा जैन, श्रीमती भाग्यश्री गुजर, श्रीमती भावना कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक श्री. निलेश गरुड, श्री. नंदकुमार देशपांडे, श्रीमती अर्चना टांकसाळे, श्रीमती आदिती मोराणकर, श्रीमती आरती गौड, श्री. राजेश शर्मा, श्रीमती प्रिया सुरते, श्री. विनोद राठोड यांनी सहभाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परिक्षण केलेे.
‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नृत्य, साहित्य कला, नाटय कला, ललीत कला आदी कला प्रकारांचा समावेश आहे. विद्यापीठात दि. 18 ते 20 ऑक्टोबर 2022 कालावधीत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण सहभागी विद्यार्थी करणार आहेत.
दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी संगीत कला प्रकारातील शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य ताल वाद्य, स्वर वाद्य, भारतीय सुगम संगीत, पाश्चिमात्य गायन, भारतीय समूहगान, पाश्चिमात्य समूहगान, लोकसंगीत, नृत्य कला प्रकारात आदीवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, साहित्य कला प्रकारात सामान्य ज्ञान चाचणी, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, नाटय कला प्रकारात एकांकिका, विडंबन नाटय, मुकअभिनय, मिमिक्री आदी कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या विविध कला प्रकारात विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सुमारे 350 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यापीठाकडून मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘इंद्रधनुष्य’ 2022 – 2023 करीता सहभागी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कला प्रकारांचे सादरीकरण अत्यंत कौतुकास्पद होते. राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आरोग्य विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असावा असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण व मेहनत अत्यंत उल्लेखनीय आहे. विद्यापीठस्तरीय निवड चाचणीत सहभागी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. ‘इंद्रधनुष्य’ विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील श्री. राजेश इस्ते, श्रीमती प्रतिभा बोडके, श्री. आबाजी शिंदे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, अभ्यांगत मोठया संख्येने उपस्थित होते.