दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
तमन्नाने अगदी कमी वयामध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली होती.
बॉलिवूडची ‘ब्युटी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी तमन्नाच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तमन्ना लवकरच मुंबईच्या एका व्यावसायिकासोबत लग्नबंधनात अडकू शकते.
दाक्षिणात्य सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. तिचा अभिनय असो किंवा ग्लॅमरस अदा तिचे चाहते नेहमीच तिच्यावर फिदा असतात. ती सर्वांचीच आवडती आहे. तमन्नाला मोठ्या पडद्यावर 17 वर्षे झाली असली तरी तिची लोकप्रियता कायम आहे.
तमन्ना लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तमन्नाच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. तमन्ना भाटिया हिने अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या ग्लॅमर लूकने एक वेगळी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे तमन्नाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आतापर्यंत तमन्ना अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका केलीये. इतकेच नाही तर फक्त बाॅलिवूडच नाही तर अनेक साऊथच्या चित्रपटांमध्येही तमन्नाने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
तमन्ना भाटिया हिने बाहुबली चित्रपटातून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. तमन्नाच्या चाहत्यांना प्रश्न पडला की, तमन्ना नेमकी कोणासोबत लग्न करणार आहे. तमन्ना ही एका बिझनेसमनसोबत लग्न करणार असून हे लग्न मुंबईमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जातंय.