दैनिक चालु वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
============
लातुर/ अहमदपूर : हाडोळती -हाडोळती तालुका अहमदपूर येथील
तुळशीराम पवार कनिष्ठ महाविद्यालयाने मे 2023 मध्ये झालेल्या नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील कौडगावे माधवी गोविंद 720 पैकी 613 गुण प्राप्त, बिरादार रोहित अंकुश 720 पैकी 580 गुण प्राप्त या विद्यार्थ्यांची एम.बी.बी.एस .साठी निवड झाली आहे.तर व्हंडाळे वैष्णवी अंगद या विद्यार्थीनींनी 720पैकी 370गुण मिळवून यश संपादन केले आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक पी. टी. पवार सर, सचिव डॉक्टर निलेश भैय्या पवार ,प्राचार्य डॉक्टर डी.डी. बच्चेवार, प्राचार्य श्री आय. एम .जोगदंड पर्यवेक्षक एम.डी. सूर्यवंशी व महाविद्यालयातील प्राध्यापक. शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.