दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावे, वाडी, तांड्यामधील नागरिकांना कंधार पोलीस स्टेशन कडून सुचना आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरीक घराला कुलूप लावून घराच्या स्लॅबवर (गच्चीवर) झोपत असल्यामुळे अज्ञात चोरटे घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात देखील चोरीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे सर्व नागरिकांना सूचना आहे, घरातील सर्व व्यक्ती बाहेर किंवा स्लॅबवर (गच्चीवर) झोपण्यापेक्षा काही व्यक्ती घरामध्ये आत मधून कडी लावून झोपावे. घरामध्ये जास्त मौल्यवान दागिने,पैसे ठेऊ नये. पैसे बँकेमध्ये ठेवावे तसेच गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे व गावामध्ये रात्रीचे वेळी नियमित गस्त ठेवावी. सरपंच यांनी गावातील मंदिराच्या माईक वरुन सर्व नागरिकांना सूचना सांगाव्यात असे कंधार पोलीस स्टेशन कडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.पेठवडज पोलीस चौकीचे जमादार श्री. जून्ने साहेब यांनी दैनिक चालू वार्ता ला कळवले आहे.